नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओबीसी आरक्षणाचा विषय प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांपर्यंत पोचवून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचं केंद्रीय पंचायती राज मंत्री कपिल पाटील यांनी सांगितलं. ते काल पालघर इथं ओबीसी हक्क संघर्ष समितीनं काढलेल्या ओबीसी आक्रोश मोर्चात बोलत होते. ओबीसीची जातीनिहाय जनगणना व्हावी आणि ओबीसीना आरक्षण मिळावं यासाठी हा मोर्चा असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या 4 तारखेला राज्य सरकारनं सादर केलेला डेटा सुप्रीम कोर्टानं स्विकारला तर ओबीसींच आरक्षण नक्की आपल्याला मिळेल असं ते म्हणाले. ज्या समाजाला हे आरक्षण देणार आहात तो समाज अतिशय मागासलेला आहे हे सुप्रीम कोर्टाला पटवून द्यावं लागेल असं पाटील यांनी सांगितलं.