नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पॅरासिटामोलपासून तयार केलेल्या औषधांवरची निर्यातबंदी केंद्र सरकारनं मागे घेतली आहे. मात्र पॅरासिटामोलच्या ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडियन्टस- सक्रिय औषधी घटकांवरची निर्यातबंदी मात्र कायम ठेवण्यात आली आहे.

केंद्र सरकारनं कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन मार्च रोजी २६ औषधांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे, पॅरासिटामोल त्यापैकी एक आहे.