नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या २० तारखेपासून केंद्रानं हॉटस्पॉट बाहेर असलेल्या उत्पादन क्षेत्राच्या शिथिलीकरणासाठी सुधारित मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. विशेष आर्थिक क्षेत्र तसच निर्यातक्षम क्षेत्रांचा यात समावेश आहे. सोशल डिस्टंन्सिंगचं पालन ही यातली मुख्य अट आहे.
अशा आस्थापनांनी शक्य तेवढ्या प्रमाणात आस्थापनांच्या आवारातच आपल्या कामगारांची वास्तव्याची सोय करावी तसंच इतर कामगारांना सुरक्षित वाहनातून सोशल डिस्टंन्सिंगचं पालन करत येण्याजाण्याची व्यवस्था करावी असे निर्देश दिले आहेत.
जीवनावश्यक वस्तू, औषधं , ग्रामीण भागातले अन्नप्रक्रिया उद्योग यांच्या उत्पादनांसाठी काही प्रमाणात शिथिलीकरण झाल्याची माहिती आमच्या प्रतिनिधींनं दिली आहे.