नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गडचिरोलीत चामोर्शी तालुक्यातल्या  गुंडापल्ली जंगल परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज मोह फुलांची दारू तयार करण्याच्या अड्ड्यावर धाड  एकूण ६ लाख ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

मात्र,आरोपी जंगलात पळून जाण्यात यशस्वी ठरले. यावेळी ३०० लिटर दारू,  ३ हजार ४०० किलो मोहसडवा आणि एक मोटर सायकल असा मुद्देमाल जप्त केला.