नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उस्मानाबाद जिल्ह्यातला तेर हा तालुका संतश्रेष्ठ गोरोबा काकांची जन्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. इतिहासात प्रथमच संतश्रेष्ठ गोरोबाकाका कुंभार यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाधी सोहळा केवळ धार्मिक विधीनं संपन्न झाला.

एकादशीपासुन सुरू होणाऱ्या या सोहळ्यासाठी शेकडो दिंडया, फडकरी आणि लाखो भाविक तेर नगरीत दाखल होत असतात. मात्र मंदीर बंद असल्यान यावर्षी मुख्य पुजारी रघुनंदन महाराज यांनी धार्मिक महाअभिषेक करून पूजा मांडली तर काही भाविकांनी मंदीराच्या पायरीचे दर्शन घेऊन आपली सेवा अर्पन केली.