नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अश्लील संकेतस्थळांना भेट देणाऱ्यांकडे खंडणी मागितल्याची प्रकरणं गेल्या काही दिवसात वाढली असल्याचं राज्य पोलीसांना आढळलं आहे.

सायबर गुन्हे विभागाचे प्रमुख बलसिंग राजपूत यांनी सांगितलं की अशा संकेतस्थळांवर मालवेअर लावून नंतर बिटकॉईनमधे खंडणी मागितली जात आहे.