नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे कोविड-19 साथीच्या आजारा विरुद्धच्या लढ्यासाठी स्थापन केलेल्या एमएचए नियंत्रण कक्षाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

गृहमंत्र्यांनी या बैठकीत नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांसोबत विविध राज्यातील कोविड-19 परिस्थितीचा आढावा घेतला तसेच त्यांची मते जाणून घेतली आणि ते करत असलेल्या अनुकरणीय कामाचे कौतुक देखील केले. एमएचए नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असून या महामारी विरुद्धच्या लढाईत ते केवळ राज्यांशीच नव्हे तर केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांशी समन्वय साधत आहे.

या बैठकीला गृह राज्यमंत्री नित्यानंद राय आणि जी. किशन रेड्डी यांच्यासह मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सामाजिक अंतराच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले गेले.