मुंबई : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यालयातील खाजगी सचिव अशोक सखाराम पाटील यांनी आज मुख्यमंत्री सहायता निधी- कोविड-19, साठी एक लाख रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे मंत्रालयात सुपूर्द केला.
कोविड विषाणू प्रार्दुभावाच्या विरोधात शासनामार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी अधिकाधिक निधी देणगी म्हणून देण्यात यावा, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. त्यानुषंगाने श्री. पाटील यांनी ही देणगी दिली आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी यापूर्वीच आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देणगी म्हणून दिले आहे.