नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रसार रोखण्यासाठी सुरू असलेली संचारबंदी शिथील केल्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं तेराशेहुन अधिक कंपन्यांना उत्पादन सुरू करण्याची परवानगी दिली आहे. सामाजिक सुरक्षित अंतर पाळून कामगारांना सॅनिटायजर तसंच उद्योगाच्या आवारातच राहण्याची सोयी देऊन उत्पादन करू शकणाऱ्या कंपन्यांना परवानगीसाठी अर्ज करण्यास महामंडळानं सांगितलं होतं.

त्यानुसार दाखल झालेल्या 3000 हजारांपैकी 1 हजार 355 कंपन्यांना उत्पादन सुरू करण्याची परवानगी महामंडळानं दिली आहे. मोठे उद्योग आपल्या कामगार क्षमतेच्या 50 टक्के कामगारांसह तर मध्यम आणि लघु उद्योग आपल्या पूर्ण कामगार क्षमतेसह नियमांच्या चौकटीत राहून उत्पादन सुरू करू शकतात असं महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.