मुंबई : थोर समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी अन्याय, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरांच्या निर्मूलनासाठी केलेल्या कार्याचं स्मरण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं आहे.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे व्यासंगी लेखक होते. विचारवंत होते. समाजातील अनिष्ट रुढी, परंपरांना त्यांनी विरोध केला. समाजाला शिक्षणाचं महत्त्व सांगितलं. वंचित घटकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली. जगण्याचा मार्ग दाखवला. अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी केलेलं कार्य हे मानवतेच्या कल्याणासाठीचं मोठे योगदान होतं. स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा विचार प्रमाण मानून त्यांनी जीवनभर काम केलं. सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात त्यांनी केलेलं कार्य, दिलेले विचार चिरंतन राहतील, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.