मुंबई (वृत्तसंस्था) : देशातल्या अन्य राज्यातून मुंबईत ये- जा करणा-या विमान प्रवाशांना आरटीपीसीआर बंधनकारक आहे. मात्र दिल्ली किंवा इतर ठिकाणी सकाळी जाऊन सायंकाळी परतणा-या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणीचा ४८ तासांचा अहवाल मिळवणं शक्य होत नाही. त्यामुळे ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशा प्रवाशांना आरटीसीपीसीआर चाचणीशिवाय प्रवास करायला मुभा द्यावी, अशी विनंती मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी राज्य सरकारकडे केली आहे.