नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यवतमाळ जिल्ह्यात कापूस, तूर, हरभरा खरेदी केंद्र बंद केल्यानं शेतकरी अडचणी असून शेतक-यांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन हमी भावानुसार खरेदी केंद्र सुरू करायचे निर्देश दिले.

जिल्ह्यात १६ खरेदी केंद्रं असून दिग्रस, दारव्हा, नेर आणि मारेगाव या तालुक्यात निधी तसंच गोडाऊन अभावी तूर खरेदी अडचणीत आली होती. मात्र, संबंधित यंत्रणांचा योग्य समन्वय घडवून जिल्ह्यात सर्व खरेदी केंद्रावर तूर आणि हरभरा खरेदी सुरू झाली आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खरेदी केंद्रावर कमाल २० गाड्यांना परवानगी असून खरेदी प्रक्रिया करताना सॅनिटायझर, हॅन्डवॉश, मास्कची सुविधा ठेवण  गरजेचं  असल्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.