नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली विविध राज्य सरकारं आणि खाजगी प्रयोगशाळांनी सुमारे ५ लाख ७९ हजार ९५७ कोविड -१९ आजाराच्या चाचण्या केल्या असल्याची माहिती आय सी एम आर अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं दिली आहे.
आय सी एम आर नं देशातल्या सरकारी आणि खाजगी प्रयोगशाळांना कोविड -१९ च्या चाचणी सुविधा द्यायचं काम सुरु ठेवलं असून आतापर्यंत २७२ सरकारी प्रयोगशाळा आणि ८७ खासगी प्रयोगशाळांना कोविड -१९ च्या चाचण्या करायला मान्यता दिली आहे.