नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कोरोना स्थितीचा आणि उपाययोजनांचा केंद्रिय मंत्रीगटानं आज आढावा घेतला. यावेळी कोरोनाविरोधातल्या उपाययोजनांची माहिती त्यांना देण्यात आली. देशात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी ९ दिवसापेक्षा जास्त वाढला असल्याची माहिती त्यांना देण्यात आली.
देशात एकशे चार कारखान्यांमध्ये दररोज एक लाख पीपीई किट तयार होत असल्याची तसचं याच प्रमाणात मास्क तयार होत असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. कोरोनाविरोधात लढण्यासाठी देशभरात एक कोटी २४ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांचा डाटा तयार केला असून त्यातल्या १० लाख लोकांना प्रशिक्षण दिलं असल्याचंही त्यांना सांगण्यात आलं.