नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड विरुद्धच्या लढ्यात महाराष्ट्र सरकारला सहकार्य करण्यासाठी उबर इंडियानं १ कोटी रुपयांची वाहतुक मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे.
या मदती अंतर्गत उबर कंपनी महाराष्ट्रात कोविड १९ विरुद्ध आघाडीवर लढत असलेले वैद्यकीय कर्मचारी, बिगर कोविड रुग्ण तसंच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी १ कोटी रुपयांची मोफत प्रवासी वाहतूक करणार आहे.