नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलानं नागरीकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरीक नोंदणी पुस्तिकेविरोधात पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. रेल्वे आणि रस्ते वाहतूक अनेक ठिकाणी विस्कळीत झाली.
आंदोलकांनी दरभंगा, जहानाबाद, बिहारशरीफ, पावापुरी आणि भाभुवा रेल्वेस्थानकांजवळ रेल रोको केलं. तर वैशाली, शेओहार, पूर्वचंपारण, अरारिया भोजपूर, लखीसराई आणि कटिहार जिल्ह्यात रास्तारोको करण्यात आलं.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्याच्या अनेक भागात बाजारपेठा, दुकानं आणि शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. राज्यात सर्वत्र पोलिस आणि सुरक्षाकर्मचारी तैनात करण्यात आले असून, ड्रोन कॅमेर्याच्या माध्यमातूनही नजर ठेवण्यात येत आहे.