नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्याच्या ग्रामीण भागातल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी हातमोजे, सॅनीटायझर तसंचं मास्कच्या खरेदीसाठी २७ जिल्ह्यांना जागतिक बँक प्रोत्साहन अनुदान योजनेअंतर्गत प्रत्येकी दहा लाख रूपयांचा निधी द्यायचा शासन निर्णय जारी केला आहे.
पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी ही माहिती दिली.