नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉक डाउनच्या काळात बरेचसे कारखाने बंद आहेत. रस्त्यावरची वाहतूकही कमी झाली असल्यानं मुंबई आणि नवी दिल्ली इथले प्रदूषणाचे १० हॉटस्पॉट ग्रीन झोनमध्ये परिवर्तित झाले असून या ठिकाणी अतिशय कमी अथवा शून्य प्रदूषणाची नोंद झाली आहे.
मुंबईत वरळी, बोरिवली आणि भांडुपमधली हवा लॉकडाऊनच्या काळात तुलनेने स्वच्छ झाल्याचं सफरच्या अभ्यासात समोर आलं आहे. मुंबईत काही प्रदुषकांचे प्रमाण ६३ टक्क्यांपर्यंत घसरल्याचं सफरनं म्हटलं आहे. पुण्यात मात्र ही घसरण ५७ टक्क्यांपर्यंत नोंदविण्यात आली आहे.