नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं राज्यांना योग्य आर्थिक सहाय्य करावं अशी मागणी राज्यसभा सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना त्यांनी याबाबत निवेदन दिल आहे.

चालू आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्र सरकारनं १ लाख कोटी रुपयांचं वाढीव आर्थिक अनुदान मिळण्याची मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं. अमेरिका, स्पेन, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रलियासह अनेक देशांनी स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या १० टक्के पॅकेज खुली केली असल्याचं ते म्हणाले.

आर्थिक उत्तरदायित्व आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापनाच्या आधारे जास्त उचल घेण्याचं धोरणही आखता येईल असं पवार यांनी म्हटलं आहे.