नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशात असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी कोविड१९मुळे उद्भवलेल्या कठीण परिस्थितीचं संधीत रूपांतर करावं, असं आवाहन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केलं आहे. ते  या विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संपर्क साधताना बोलत होते.

देशातले व्यवहार पूर्ववत सुरू करताना कोविड१९चा प्रसार होणार नाही, याची प्रत्येकानं खबरदारी घ्यायला हवी. कोविड टाळेबंदीचा परिणाम देशातल्या मोठ्या, मध्यम,  लघु आणि सूक्ष्म  उद्योगावर झाला असून या उद्योगांनी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भागीदारी करण्याची गरज असल्याचं गडकरी म्हणाले.

परदेशातले भारतीय विद्यार्थी तसंच तरुण संशोधक आपल्या संशोधनातून आणि व्यवस्थापन कौशल्यानं उद्योगांच्या उत्कर्षाला हातभार लावतील अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली.