पुणे : जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1538 झाली आहे.230 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरीगेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1223आहे. पुणे जिल्हयात कोरोनाबाधीत एकुण 85 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 79 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.

विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1702 झाली आहे.विभागातील 264 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरीगेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1344 आहे.विभागात कोरोनाबाधीत एकुण 94 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 80 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.आजपर्यत विभागामध्ये एकुण 17747 नमूने तपासणीसाठी पाठविणेत आले होते त्यापैकी 16908 चा अहवाल प्राप्त आहे. 839 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 15151 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 1702 चा अहवाल पॉजिटिव्ह आहे.

आजपर्यंत विभागामधील 59,91,999 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 2,29,48,395 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1375 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे, (संध्या 4.00 वाजेपर्यत)