नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुंतवणूकदारांना आवश्यक असणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या मंजुरी मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी संबंधित मंत्रालयांनी अधिक सहकार्य करण्याचे निर्देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. देशात परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठीच्या योजनेसंदर्भात आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत प्रधानमंत्री बोलत होते.
covid-19 च्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत गुंतवणुकीला तसंच अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उपायांवरही या बैठकीत चर्चा झाली.मुलभूत सुविधा क्षेत्र तसंच राष्ट्रीय उद्योगात परदेशी गुंतवणूक वाढावी यासाठीच्या धोरणांची आखणी या बैठकीत करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री ,अर्थमंत्री, उद्योगमंत्री यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.