नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १ मे. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा साठावा वर्धापन दिन. महाराष्ट्र दिनी दादरच्या शिवाजी पार्कवर होणारा शासकीय सोहळा यावेळी लॉकडाऊनमुळे रद्द केला आहे. त्याऐवजी मुंबईत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राज भवनात सकाळी ८ वाजता ध्वजारोहण होईल.

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांचा जनतेला उद्देशून संदेश आकाशवाणीवरुन तसंच दूरदर्शनच्या सहयाद्री वाहिनीवरून सकाळी ९ वाजता प्रसारित केला जाणार आहे.

मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. तत्पूर्वी मुख्यमंत्री हुतात्मा स्मारक इथं जाऊन संयुक्त महाराष्ट्र लढ्यातल्या हुतात्म्यांना वंदन करतील.