पुणे : पोलीस आयुक्तालय असलेल्या शहरामध्ये (उदा. औरंगाबाद, नाशिक, अमरावती, सोलापूर नागपूर आदी) आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या पोलिस उपायुक्तांना आहेत.

असे अधिकार असले तरीही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रामधील नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात जाण्यास अथवा त्या जिल्ह्यातून या प्राधिकरण क्षेत्रात येण्यास परवानगी नाही.

मात्र, या दोन्ही प्राधिकरण क्षेत्रातून महाराष्ट्राबाहेर (विशेषत: कामगार, मजुरांना) जाण्याची परवानगी आहे.

अशा परवानगीसाठी जवळच्या पोलीस ठाण्यात संपूर्ण माहितीसह मेडिकल प्रमाणपत्रासह अर्ज करता येईल. सर्व पोलिस ठाण्याची माहिती एकत्र करून त्या विभागांच्या पोलीस उपआयुक्तांकडे पाठविली जाईल. अर्जाची छाननी करून नियमानुसार आणि तेथील कोविड-१९ प्रादुर्भाव परिस्थितीचा विचार करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

कृपया अर्धवट किंवा अनधिकृत किंवा ऐकीव, सांगोवांगीने दिल्या जाणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये, कोणीही कुठेही धावाधाव करू नये. राज्य शासनाच्या सर्व निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्यातील लॉकडाऊन मुळे जिल्हात अडकलेल्या परराज्यातील व महाराष्ट्रातील इतर राज्यातील मजुर/विद्यार्थी/यात्रेकरु व इतर Containment zone च्या बाहेर असणारे लोकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी परवानगी हवी असल्यास त्यांनी खालील लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती भरावी. माहिती भरताना सोबत खालील कागदपत्रे Upload करावीत.

1) नजीकच्या काळातील स्पष्ट फोटो
File Size 200 kb पर्यंत

2) नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक (Registered Medical Practitioner) यांचे कुठल्याही फ्लू सदृश्य आजार नसल्याचे प्रमाणपत्र आपल्या पत्त्यासह किंवा आधारकार्ड
File size 500 KB पर्यंत

https://covid19.mhpolice.in/

अधिक माहितीसाठी संपर्क करा
020 26111061
020 26123371

E-mail Id:-
dcegspune1@gmail.com