पुणे : पुणे विभागातील 410 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 हजार 87 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 566 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 111 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 79 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
विभागात 2 हजार 87 बाधित रुग्ण असून 111 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 1 हजार 876 बाधीत रुग्ण असून 101 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 54 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 111 बाधीत रुग्ण असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 32 बाधीत रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 14 बाधीत रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 21 हजार 599 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 20 हजार 767 चा अहवाल प्राप्त झाला आहे. प्राप्त अहवालांपैकी 18 हजार 613 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 2 हजार 87 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील 69 लाख 4 हजार 918 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 2 कोटी 68 लाख 56 हजार 918 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 590 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.