नवी दिल्ली : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत महिला जनधन खात्यांमधे प्रत्येकी ५०० रुपयांचा दुसरा हप्ता भरण्यासाठी केंद्र सरकारने निधी मंजूर केला आहे. हा निधी आता बँका लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करतील. पैसे काढण्यासाठी बँकांमधे गर्दी होऊ नये या दृष्टीने निधी वाटपाच्या तारखाही ठरवून दिल्या आहेत.

खातेक्रमांकाचा शेवटचा आकडा शून्य किंवा एक असेल अशा खातेदारांनी ४ मे रोजी पैसे काढावे, २ किंवा ३ या आकड्यांनी संपणाऱ्या खात्यातून ५ मे रोजी तर ४ किंवा ५ या आकड्यांनी संपणाऱ्या खात्यातून ६ मे रोजी पैसे काढावेत, असं सरकारनं सुचवलं आहे. त्याचप्रमाणे आपला खातेक्रमांक ६ किंवा ७ ने संपत असेल तर ८ मे रोजी बँकेत जावं, ८ किंवा ९ आकडा खातेक्रमांकात शेवटचा असेल तर ११ मे रोजी पैसे काढावेत, असं सरकारनं सांगितलं आहे.