नवी दिल्ली : एअर इंडिया, अलियान्स एअर, भारतीय वायुदल आणि खाजगी विमान कंपन्यांनी लाइफलाइन उडान या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत एकूण 422 उड्डाणे केली आहेत. यापैकी अलियान्स आणि एअर इंडियाने 244 उड्डाणे करत आत्तापर्यंत 790.22 टन मालाची विमान वाहतुक केली आहे. लाईफ लाईन उडान अंतर्गत आत्तापर्यंत झालेल्या विमान वाहतूकीने आत्तापर्यंत कापलेले अंतर 4,13,538 किलोमीटर एवढे आहे. कोविड-19 च्या विरुद्ध भारत देत असलेल्या जमजत देशाच्या दुर्गम भागात औषधे पोचवण्यासाठी MoCA ने उपयुक्त औषधे आणि वैद्यकीय मालाच्या वाहतुकीसाठी लाईफ लाईन उडानचा उपयोग केला.
जम्मू-काश्मीर , लडाख, बेटे तसंच ईशान्य भागात औषधांची आणि रुग्णांची ने-आण करण्यासाठी पवनहंस लिमिटेड या हेलिकॉप्टर सेवेचा उपयोगही करण्यात आला. 1 मे 2020 पर्यंत पवनहंसने 7,529 कि.मी. अंतर कापत 2.03 टन मालाची वाहतूक केली. विशेषत: ईशान्य भाग, बेटे तसंच डोंगराळ भागात या सेवेचा वापर करण्यात आला. एअर इंडिया आणि वायुदलाच्या विमानांनी प्रामुख्याने जम्मू -काश्मीर, लडाख , ईशान्य भाग तसंच बेटांच्या क्षेत्रात संयुक्तपणे ही कामगिरी पार पाडली.
स्पाइस जेट, ब्ल्यू डार्ट, इंडिगो यांच्यासारख्या अंतर्गत विमान मालवाहतूक कंपन्या या व्यापारी तत्वावर मालवाहतूक करणाऱ्या कंपन्या. यापैकी स्पाइस जेटने 734 माल वाहतूक विशेष विमाने 24 मार्च ते 1 मे 2020 च्या दरम्यान सोडली, आणि मालवाहतुकीसाठी 12,77,213 किलोमीटर एवढा प्रवास करत 5320 टन माल विमान वाहतूकीने पोचवला.
यापैकी 270 मालवाहतुकीसाठी ची आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे होती. ब्लू डार्ट या सेवेने 245 मालवाहतूक विशेष उड्डाणे करून 2,67,470 किलोमीटर अंतर कापत 4,179 टन मालाची मालवाहतूक 25 मार्च 19 ते 20 दरम्यान केली. यापैकी 12 मालवाहतुकीसाठीची आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे होती. इंडीगोने 27 आंतरराष्ट्रीय उड्डाणांसह एकूण 82 कार्गो उड्डाणे केली. 3 एप्रिल ते 1 मे 2020 च्या दरम्यान केलेल्या या कार्गो उड्डाणांनी 1,36,060 किलोमीटरचे अंतर कापले आणि 393 टन माल वाहून नेला. यामध्ये सरकारी मोफत औषधांची वाहतूकही करण्यात आली. विस्ताराने 20 कार्गो फ्लाइट्स 19 एप्रिल 1 मे 2020 दरम्यान केल्या. त्यामध्ये 28,590 किलोमीटरचे अंतर कापले गेलं आणि 139 टन मालाची वाहतूक झाली.
आंतरराष्ट्रीय क्षेत्रात हवाई मार्गाने माल वाहून नेण्यासाठी ईस्ट एशियाच्या सहयोगाने औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि covid-19 संबंधित संरक्षक मालाची वाहतूक करण्यात आली. एअर इंडियाने 842 टन मालाची हवाई वाहतूक केली त्याशिवाय ब्लू डार्ट 114 औषधे आणि शांघाई मधून 14 एप्रिल ते 11 मे 2020 दरम्यान केली. स्पाइस जेटनेही 1 मे 2020 पर्यंत ग्वांगत्झू आणि शांघाई भागातून 204 टन तसंच हॉंगकॉंग, सिंगापूर मधून 16 टन औषधांची हवाई वाहतूक केली.