नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात परवापासून सुरू होणाऱ्या टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात देशातल्या अर्ध्यापेक्षा जास्त भागात व्यवहार पूर्ववत होतील, अशी अपेक्षा माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली आहे.
टाळेबंदीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात आपल्याला अन्य देशांच्या तुलनेत मोठं यश प्राप्त झालं आहे, असंही ते म्हणाले. विरोधकांकडे अन्य मुद्दे नसल्यानं ते केवळ विरोधासाठी विरोध करत आहेत, अशी टीकाही त्यानी केली.