नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला सावरण्यासाठी तातडीनं आर्थिक मदतीची योजना जाहीर करण्याची गरज असल्याचं मत नोबेल पारितोषिक विजेते प्रसिद्ध अर्थतज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत ऑनलाईन संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

परिस्थितीतून देशाला पुन्हा उभं करण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींसाठी खर्च करणं हा सहज अवलंबता येण्यासारखा मार्ग आहे, तसंच गरीबांना अन्न धान्याचा पुरवठा करण्यासाठी तात्पुरती रेशन कार्डही वितरीत करता येऊ शकतील असंही बॅनर्जी यांनी सुचवलं आहे.