नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गामुळं सुमारे दोन महिन्यांपासून चित्रपट आणि मालिकांचं चित्रीकरण बंद आहे. आता हे चित्रीकरण सुरू करण्याची तयारी काही वाहिन्या आणि निर्मात्यांनी केली आहे. ग्रीन झोनमध्ये चित्रीकरण सुरू करता येईल का याची चाचपणी सध्या सुरू आहे.
त्यामुळं चित्रीकरणाशी निगडीत सर्वांना वैद्यकीय चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र रेड झोनमध्ये अडकलेले कलाकार आणि इतरांना बाहेर काढण्याची समस्या निर्मात्यांसमोर आहे. त्यामुळं कमीत कमी जणांमध्ये आणि नियमांचं पालन करून कशाप्रकारे चित्रीकरण करता येईल यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न निर्मात्यांनी सुरू केले आहेत.