नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमा सुरक्षा दलाच्या आणखी ८५ कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्याचं आढळलं असून आतापर्यंत १५४ जणांना संसर्ग झाला आहे.सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी आज नवी दिल्ली इथं ही माहिती दिली.

बाधितांपैकी अनेकजण दिल्लीच्या हॉटस्पॉट मधे बंदोबस्तावर होते तर काही आंतरमंत्रालयीन पथकाबरोबर पश्चिम बंगालमधे गेले होते. ३७ जवान त्रिपुरा सरहद्दीवर तैनात होते.दरम्यान गेले २ दिवस बंद ठेवलेले दलाच्या मुख्यालयाचे २ मजले आजपासून पूर्ववत खुले करण्यात आले आहेत.