नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बँकेच्या मध्यवर्ती मंडळावर आर्थिक व्यवहार सचिव तरुण बजाज यांची नेमणूक झाली आहे. ते भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९८८ च्या तुकडीतले अधिकारी असून नुकतेच सेवा निवृत्त झालेले संचालक अतनु चक्रवर्ती यांची जागा घेतील. तरुण बजाज यापूर्वी प्रधानमंत्री कार्यालयात अतिरिक्त सचिव होते.