नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय स्टेट बँकेनं कर्जावरच्या व्याजदरात कपात करायचा निर्णय घेतला आहे. कर्जावरचा व्याजदर आता ७ पूर्णांक ४० शतांश टक्क्यावरून कमी होऊन सव्वासात टक्के होणार आहे.
रविवारपासून नवे दर लागू होणार आहेत. बँकेनं ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीवरचा व्याजदरही ३ दशांश टक्क्यांनी वाढवला आहे. मुदत ठेवींसाठी वाढींव व्याजदर ३० सप्टेंबर पर्यंत असून केवळ ५ वर्षांहून अधिक कालावधीच्या गुंतवणुकीसाठी लागू असतील.