नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुंतवणुकदारांनी खरेदीवर भर दिल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज १९९ अंकांची वाढ झाली आणि तो ३१ हजार ६४३ अंकांवर बंद झाला.

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टितही दिवसअखेर ५२ अंकांची वाढ झाली आणि तो ९ हजार २५१ अंकांवर बंद झाला. जागतिक बाजारात सुधारलेली स्थिती आणि देशात परकीय गुंतवणुकीचा वाढत असलेला ओघ, यांचा आज शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम दिसल्याचं बाजार सूत्रांनी सांगितलं.