नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या १७७ कृषी उत्पन्न बाजारपेठा राष्ट्रीय बाजारपेठांना जोडण्याच्या योजनेचं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज उदघाटन केलं. या योजने अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी उत्पादनाची विक्री करता येईल.
या पोर्टलला जोडण्यात आलेल्या बाजारपेठांमध्ये महाराष्ट्रातल्या ५४ गुजरातमधल्या १७ हरिणामधल्या २६ तर पंजाबमधल्या १७ कृषी उत्पन्न बाजारपेठांचा समावेश आहे. राष्ट्रीय कृषी उत्पन्न बाजारपेठेला जोडण्यात आलेल्या देशातल्या एकूंण बाजारपेठांची संख्या आता ९६२ झाली आहे.