नवी दिल्ली : नॅशनल इलेक्ट्रीक मोबिलिटी मिशन प्लॅन (एनईएमपीपी) 2020 देशात इलेक्ट्रिक वाहने आणि त्यांचे उत्पादन जलद गतीने घेण्यासाठी दृष्टीकोन आणि रूपरेषा पुरवणारे एक राष्ट्रीय मिशन दस्तऐवज आहे एनईएमएमपी 2020 चा भाग म्हणून, अवजड उद्योग विभागाने विद्युत आणि हायब्रीड इलेक्ट्रिक वाहनांची जलद वाढ आणि निर्मिती (फेम इंडिया) योजना 2015 मध्ये तयार केली. विद्युत आणि हायब्रिड वाहन तंत्रज्ञानाच्या निर्मितीस प्रोत्साहन देणे आणि त्यातील शाश्वत विकास सुनिश्चित करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
या योजनेचा पहिला टप्पा 1 एप्रिल 2015 पासून 2 वर्षांसाठी सुरू करण्यात आला होता, जो नंतर वेळोवेळी वाढविला गेला आणि अंतिम विस्तार 31 मार्च 201 9 पर्यंत करण्याची परवानगी देण्यात आली. फेम इंडिया योजनेचा पहिला टप्पा (i) मागणी निर्मिती, (ii) तंत्रज्ञान मंच (iii) प्रायोगिक प्रकल्प आणि (iv) पायाभूत सेवांना प्रोत्साहन या चार प्रमुख क्षेत्राद्वारे राबवण्यात आला. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात एकूण 2 लाख 78 हजार विद्युत वाहनांना मागणी होती. तसेच 465 बसेसना मंजुरी देण्यात आली.
अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री अरविंद सावंत यांनी लोकसभेत ही माहिती दिली.