नवी दिल्ली : अमली पदार्थांची तस्करी आणि संबंधित बाबींवर ठोस कारवाई करण्यासाठी अमली पदार्थ नियंत्रण विभाग (एससीबी) आणि म्यानमारच्या अमली पदार्थ नियंत्रण केंद्रीय समिती (सीसीडीएसी) यांच्यात नवी दिल्लीत चौथी महासंचालक स्तरीय चर्चा झाली.
भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व एनसीबीचे महासंचालक अभय यांनी तर म्यानमार प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व सीसीडीएसीचे संयुक्त सचिव ब्रिगेडीयर जनरल विन नाईंग यांनी केले. ही बैठक दोन दिवस चालणार असून, आजच्या पहिल्या दिवशी उभय पक्षांनी अमली पदार्थांच्या समस्येबाबत चिंता व्यक्त केली. तसेच याच्या तस्करीसंबंधी महत्वपूर्ण माहितीचे आदान-प्रदान करण्याचे संकल्प जाहिर केले.