नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यात मागणी आणि पुरवठ्यातील तफावत, प्रतिकूल हवामानाच्या स्थितीमुळे उत्पादनात घट, वाहतुकीचा वाढता खर्च, साठवणूक सुविधांचा अभाव, साठेबाजी यांवरुन 22 आवश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारने वेळोवेळी अनेक उपाययोजना केल्या आहेत.

ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लोकसभेत ही माहिती दिली.