नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेनं बारा मे पासून सुरू केलेल्या विशेष रेल्वे सेवेची पुढच्या सात दिवसांसाठी दोन लाखापेक्षा जास्त तिकिटं प्रवाशांनी आरक्षित केली आहेत. या तिकीट विक्रीतून रेल्वेला ४५ कोटी तीस लाख रुपये उत्पन्न मिळालं आहे.
या विशेष रेल्वेतून काल दिवसभरात २० हजार १४९ प्रवाशांनी प्रवास केला, तर आज धावणाऱ्या १८ रेल्वे गाड्यांमधून २५ हजारावर प्रवासी प्रवास करत असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.