नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशियाई क्रीडास्पर्धांमधले विजेते टेनिसपटू अंकिता रैना आणि दिविज शरण यांच्या नावाची शिफारस राष्ट्रीय टेनिस महासंघाने यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी केली आहे. अंकिताने 2018मधे आशियाई क्रीडास्पर्धांमधे महिला एकेरीचं कांस्यपदक मिळवलं हेतं तर दिविजने 2019 मधे जकार्ता इथं रोहन बोपण्णाच्या साथीने पुरुष दुहेरीचं सुवर्णपदक पटकावलं होतं.

ऑल इंडीया टेनिस असोसिएशनचे सरचिटणीस हिरण्मय चतर्जी यांना सांगितलं की ध्यानचंद किंवा द्रोणाचार्य पुरस्कारासाठी ज्येष्ठ टेनिसपटू नंदन बाळ यांच्या नावाची शिफारस करण्याचा प्रस्ताव आहे. आतापर्यंत एकाही टेनिस प्रशिक्षकाला द्रोणाचार्य पुरस्कार मिळालेला नाही. तर झीशान अली, SP मिश्रा आणि नितीन कीर्तने या तिघांना ध्यानचंद पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.