नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या काळात सर्व दंतवैद्यकांच्या सेवेवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं निर्बंध लादले आहेत. रेड झोनमध्ये केवळ अत्यावश्यक उपचार तर इतर ठिकाणी केवळ अत्यावश्यक आणि तत्काळ उपचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
उपचार केले नाही तर रुग्णाचा मृत्यू ओढावू शकतो अशा उपचारांचे वर्गीकरण अत्यावश्यक तर ज्यामुळे रुग्णाचा मृत्यू होणार नाही मात्र तत्काळ उपचाराची आवश्यकता आहे अशांचे वर्गीकरण तत्काळ उपचारांमध्ये करण्यात आले आहे. दातांचे उपचार करताना रुग्णांच्या लाळेशी संबंध येतो आणि यात कोरोना विषाणू आढळून येण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं हे निर्बंध लादण्यात आले आहेत.