नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू बाधितांवर उपचारासाठीचे खासगी रुग्णालयांचे दर पाहता, सरकारनं त्यावर नियंत्रण आणण्याची गरज, विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन, त्यांना एक निवेदन सादर केलं, त्यानंतर फडणवीस माध्यमांशी बोलत होते.
खरीप हंगाम तोंडावर आला आहे, यासाठी सरकारची काहीही तयारी नाही, शेतमाल खरेदीची व्यवस्था नाही, असे सांगतानाच, केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारनेही बारा बलुतेदारांसाठी, विशेषत: शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली. सर्वपक्षीय बैठकीनंतरही सरकारनं काहीही निर्णय घेतला नाही, बैठक ही फक्त औपचारिकता असू नये, असं सांगतानाच स्थलांतरित कामगारांसाठी पुरेशा बसगाड्यांची व्यवस्था सरकारनं केली नाही,अशी टीका फडणवीस यांनी केली.