नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : CAPF, अर्थात केंद्रीय सशस्त्र दलाच्या ५ कंपन्या राज्यात दाखल झाल्या असून आजपासून त्या विविध ठिकाणी तैनात केल्या जात आहेत. राज्य पोलीस दल कोवीड विरोधातल्या लढ्यात आघाडीवर लढत असून या दलातल्या १२०० अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस दलाच्या मदतीला CAPF च्या २० कंपन्या द्याव्यात अशी मागणी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी केंद्र सरकारकडे केली होती. यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ३, तर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या दोन कंपन्यांचा समावेश आहे. या प्रत्येक कंपनीत १२० प्रशिक्षित आणि सशस्त्र जवान आहेत.
५५ वर्षांवरच्या वयातले कर्मचारी वगळता मुंबई पोलिस दलातले अन्य कर्मचारीही आहेत तिथं कायम राहतील.