नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दरम्यान देशभरातील १० लाखांहून अधिक आरोग्य कर्मचार्यांना आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. काल एका दिवसांत २ लाख ३३ हजार कर्मचार्यांना लस देण्यात आली; लसीकरण मोहीम सुरु झाल्यापासून एका दिवसांत लस घेणाऱ्यांची ही सर्वाधिक संख्या असल्याचं आरोग्य मंत्रालयानं ट्विटर संदेशांत म्हटलं आहे.

गेल्या १६ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात; जगातील सर्वात मोठ्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा प्रारंभ केला. ऑक्सफर्ड विद्यापीठाने जारी केलेल्या आकडेवारीनूसार पहिल्या सहा दिवसांत १० लाख नागरिकांना लस देणारा भारत हा सर्वात वेगवान देश असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

या माहिमेसाठी आता दररोजच्या नियोजनाऐवजी आठवडयाभराचं नियोजन करण्यात येत असल्याचं आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनोहर अगनानी यांनी सांगितले.