नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या महामारीमुळे जगभरात ६ कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या गरिबीच्या खाईत लोटली जाण्याची भीती जागतिक बँकेनं व्यक्त केली आहे.
यादृष्टीनं जगातल्या १०० विकसनशील देशांना १६० अब्ज डॉलर्सचं अर्थसहाय्य जागतिक बँकेनं जाहीर केलं आहे. अध्यक्ष डेव्हीड मालपास यांनी काल वार्ताहर परिषदेत सांगितलं की या १०० देशांमधे मिळून जगातली ७० टक्के लोकसंख्या आहे.