नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय टपाल विभागानं १५ देशांसाठी आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्ट सेवा पुन्हा सुरु केली आहे. तसंच यापूर्वी उपलब्ध गंतव्य ठिकाणांसाठी आंतरराष्ट्रीय ट्रॅक पैकेट सेवाही सुरु केली आहे.

या सेवांच्या माध्यमातून टपाल पोहचण्याची वेळ आंतरराष्ट्रीय विमान सेवेच्या परिचालनावर अवलंबून असेल असं दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.

अन्य आंतरराष्ट्रीय पार्सल आणि टपालांसाठी आरक्षणावरील स्थगिती कायम राहील असे ते म्हणाले.