नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी बंद ठेवण्यात आलेले नवी मुंबई इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातले  ५ भाजी बाजार १८ मे पासून टप्प्या टप्प्यानं सुरु करण्यात आले.

मात्र ग्राहक येत नसल्यानं बाजारातल्या कृषी मालाला उठाव मिळत नसून, गेले ५ दिवस कांदा आणि बटाटा मोठ्या प्रमाणात पडून असल्याचं एका व्यापाऱ्यानं आमच्या वार्ताहराला सांगितलं.