नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड लसीकरणाचं यश हे भारताचं सामर्थ्य प्रदर्शित करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. एकात्मिकप्रयत्नातून देशाच्या नागरिकांनी लसीकरणाद्वारे भारताला सर्वोच्च पातळीवर नेल्याचंमत प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केलं.
१०० कोटी मात्रानंतर आज देश नवा उत्साह, नव्या ऊर्जेनं पुढे जात असल्याचं ते म्हणाले. आकाशवाणीच्या मनकी बात कार्यक्रमात बोलतांना मोदी यांनी १०० कोटी लसीकरण मात्रेच्या सफलतेसोबत लाखोंप्रेरक प्रसंग जोडलेले असल्याचं सांगितलं. या अभियानाच्या यशानं आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम आणि संकल्पानं एक नवा आदर्श निर्माण केला आहे, असंहीते म्हणाले. अमृत महोत्सवात आपली कला,संस्कृति,गीत,संगीत यांचे रंग अवश्य भरलेपाहिजेत.
मलाही आपल्याकडून अमृत महोत्सव आणि गीत संगीत कलेच्या या शक्तिशी जोडले गेलेलेअनेक सूचना मिळत आहेत. या सूचना माझ्यासाठी खूप मौल्यवान असून त्या सांस्कृतिक मंत्रालयाकडे विचारार्थ पाठवल्याअसल्याचं त्यांनी सांगितलं. स्वातंत्र्याच्या लढाईत वेगवेगळ्याभाषा, बोलीमधल्यादेशभक्तिपर गीतांनी आणि भजनांनी पूर्ण देशालाएकत्र आणलं होतं. आता अमृतकाळात, देशातील युवक देशभक्तिवरीलअशीच गीतं लिहून त्यांचं आयोजन करून उर्जा निर्माण करू शकतात,असं ते म्हणाले. देशभक्तिची ही गीतं मातृभाषेत असू शकतील,राष्ट्रभाषेत असू शकतील किंवाइंग्रजीतही लिहू शकतात. मात्र या रचना नव्या भारताचा विचार करणाऱ्या आणि देशाच्या वर्तमानातील यशापासून प्रेरणा घेऊन भविष्यासाठीदेशाला संकल्पित करणाऱ्या असायला हव्यात, असं ते म्हणाले.
सांस्कृतिक मंत्रालयानं तर तालुका स्तरापासून तेराष्ट्रीय स्तरापर्यंत अशी स्पर्धा आयोजित करण्याची तयारी दर्शवली आहे.रांगोळीच्या माध्यमातून सणांमध्येरंग भरण्याची परंपरा आपल्याकडे शतकांपासून आहे. रांगोळीत देशाच्या विविधतेचं दर्शनहोत असतं. वेगवेगळ्या राज्यांत, वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या कल्पनांवर रांगोळ्या काढल्याजातात. म्हणून सांस्कृतिक मंत्रालय याच्याशी जोडलेली एक राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करणारआहे. मित्रांनो, या तिन्ही स्पर्धा ३१ ऑक्टोबरला सरदार साहेबांच्या जयंतीदिनापासून सुरू होत आहेत.येत्या काही दिवसात सांस्कृतिक मंत्रालय याच्याशी संबंधित सारी माहिती देईल. ही माहितीमंत्रालयाच्या वेबसाईटवर असेल आणि समाजमाध्यमांवरूनही दिली जाईल.
अमृत महोत्सवात आपण देशाचेवीर पुत्र आणि कन्यांच्या महान पुण्यात्म्यांचं स्मरण करत आहोत. पुढच्या महिन्यात १५ नोव्हेंबरला महापुरूष वीर योद्धा भगवानबिरसा मुंडा यांची जयंती आहे. भगवान बिरसा मुंडा यांनी आपल्याला आपली संस्कृती आणि मूळांबद्दल अभिमान बाळगायला शिकवलं. निसर्ग आणि पर्यावरणावरत्यांनी प्रेम करायला शिकायचं, असं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं. परकीय सरकारच्या ज्या गोष्टींमुळेपर्यावरणाला नुकसान पोहोचणार आहे, अशा प्रत्येक धोरणाला त्यांनी अगदी कडाडून विरोध केला. गरीबआणि अडचणी-समस्या यांच्या चक्रात अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी भगवान बिरसा मुंडानेहमीच आघाडीवर असायचे. आज 24 ऑक्टोबरला यूएन डे म्हणजेच ‘संयुक्त राष्ट्र दिवस‘ साजरा केला जातो.
संयुक्त राष्ट्राची स्थापना आजच्या दिवशी झाली.संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेपासून भारत त्याच्याशी जोडला आहे. संयुक्त राष्ट्राचाप्रभाव आणि त्याची शक्ती वाढविण्यासाठी भारताच्या नारीशक्तीने अतिशय महत्वाची- मोठीभूमिका बजावली असल्याचं त्यांनी सांगितलं.1953 मध्येविजया लक्ष्मी पंडित या संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्याचंत्यांनी सांगितलं. भारताने सदैव विश्वाच्याशांतीसाठी काम केले आहे. 1950 च्या दशकापासून सातत्याने संयुक्त राष्ट्र शांती मोहिमेचा भारतएक हिस्सा बनला आहे, या गोष्टीचा भारताला अभिमान वाटतो. गरीबी हटवण्यासाठी,हवामान बदलाची समस्या आणिश्रमिकांसंबंधी प्रश्नांवर तोडगा काढण्याचा विषय असो,या सर्वांमध्ये भारताने अग्रणीभूमिका निभावत आहे, असल्याचं त्यांनी सांगितलं.