नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविधतेत एकता हे भारताचं वैशिष्ट्य असून एकमेकांमधे सतत आणि सखोल संवाद होत राहिला पाहिजे, असं मत नागपूर इथं आयोजित राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेत उपस्थित सर्व धार्मिक नेत्यांनी व्यक्त केलं आहे. लोकमत समूहानं त्यांच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ही परिषद आयोजित केली आहे. धार्मिक बंधुभावापुढची जागतिक आव्हानं आणि भारताची भूमिका या विषयावर या परिषदेत चर्चा होत आहे. या एकदिवसीय परिषदेला पतंजली योगपिठाचे बाबा रामदेव, आचार्य लोकेश मुनी, मुंबईचे आर्चबिशप कार्डिनल ओसवाल्ड ग्रेशिअस, भिक्खू संघसेन, हाजी सैद सलमान चिश्ती आणि इतर अनेक धार्मिक नेते या परिषदेत सहभागी झाले आहेत.