नवी दिल्ली : भारताची संस्कृती, वारसा आणि परंपरा मुलांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे.
पोलंड आणि युक्रेन येथे आयोजित ‘ब्रेव्ह किडस् फेस्टीवल 2019’ या वीर मुलांसाठी आयोजित महोत्सवात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या मुलांशी उपराष्ट्रपतींनी संवाद साधला.
एनएसएस, एनसीसी, स्काऊट-गाईड इत्यादी स्वयंसेवी उपक्रमांमध्ये मुलांनी सहभागी व्हावे, याकरिता शाळांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले. तसेच ब्रेव्ह किडस् सारख्या आंतरराष्ट्रीय महोत्सवांमुळे युवा पिढी मैत्री आणि एकमेकांच्या संस्कृतीचा आदर करणे यासारख्या बाबी समजू शकेल, असे उपराष्ट्रपतींनी सांगितले.